News34 chandrapur
गोंडपीपरी - बहिणीची छेड काढणाऱ्या सरपंचाला भावंडांनी भर चौकात मारहाण केल्याची घटना गोंडपिपरी शहरात घडली.या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मारहाण झालेले सरपंच निलेश पुलगमकर हे भाजपचे पदाधिकारी आहेत. Teasing a young woman
या प्रकाराची तक्रार अद्याप पोलीस स्टेशनला दिलेली नाही. समाजमाध्यमात या प्रकाराची खमंग चर्चा सुरू आहे.
BJP office bearer beaten up
हिवरा गावाचे सरपंच तथा भाजप पदाधिकारी निलेश पुलगमकर याने बसमध्ये मुलींची छेड काढली. ही बाब मुलींन भावडांना सांगितली. भावांचा संताप अनावर झाला होता. अश्यात सरपंच तहसील कार्यालय परिसरात असल्याची माहिती भावंडाना मिळाली.भावंडांनी गोंडपिपरी तहसील कार्यालय गाठले.सरपंच पुलगमकार यांची धुलाई केली. सरपंचाची धुलाई झाल्याची वार्ता गोंडपिपरी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली.विशेष म्हणजे धुलाई करताना अनेकांनी बघितलं.मात्र सरपंचाला सोडवायला कुणीच गेलं नाही.या घटनेची तालुक्यात खमंग चर्चा सुरू आहे.
समाजमाध्यमात सरपंचाची चांगलेच चिमटे काढले जात आहेत. दरम्यान माझ्यावर राजकीय वैमनस्यातून हमला करण्यात आला. मी कोणत्याही मुलीची छेडखानी केली नाही. माझ्यावर खोटा आरोप लावत आहे. याची कुठेही तक्रार नाही.असे पुलगमकर म्हणाले.
