News34 chandrapur
चंद्रपूर - दारूबंदी काळात अवैध दारूचा व्यापार, दारूबंदी उठल्यावर दारू दुकान वाढीस प्रथम प्राथमिकता असा प्रवास खासदार धानोरकर यांचा असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कांग्रेसकडून उमेदवार म्हणून धानोरकर नकोच असा आरोप व कांग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याकडे पत्राद्वारे राष्ट्रवादी कांग्रेसचे जेष्ठ नेते मोरेश्वर टेम्भूर्डे यांनी तक्रार केली आहे. Rahul gandhi
मित्रपक्षाच्या नेत्यानेचं धानोरकर यांना उमेदवारी द्यायची नाही अशी तक्रार केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
याबाबत टेम्भूर्डे यांनी दिलेल्या तक्रारीच्या पत्रात खासदार धानोरकर हे शिवसेनेतून कांग्रेसमध्ये दाखल झाले, त्यांना कांग्रेस पक्षातर्फे लोकसभा उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, नंतर पवार साहेबांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानन्तर धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी. Mp balu dhanorkar
त्यांचा विजय व्हावा यासाठी सर्व नेते मंडळींनी अतोनात प्रयत्न केले, धानोरकर यांनी लोकसभा जिंकली मात्र त्यानंतर ते पूर्णतः बदलले.
2019 काळी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होती, त्यांनी त्या परिस्थितीचा पूर्ण फायदा घेतला, मात्र कांग्रेस हा महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे, दारूचं काम करा हे सांगणारा पक्ष नाही. Loksbha 2024
जर कांग्रेस पक्षाला चंद्रपूर लोकसभेत विजय मिळवायचा असेल तर धानोरकरांना उमेदवारी नाकारून चांगल्या सक्षम उमेदवाराला देण्यात यावी अन्यथा कांग्रेस तोंडघशी पडणार.
विशेष म्हणजे राज्यात मागील लोकसभा निवडणुकीत कांग्रेसने फक्त चंद्रपूर लोकसभेवर विजय मिळविला होता.
टेम्भूर्डे यांच्या तक्रारींवर राहुल गांधी यांचे उत्तर काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

