News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री,ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, मान.छगनजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त १५ आक्तटोबर २०२२ रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चंद्रपूर जिल्हा (पूर्व विभाग) यांचे तर्फे मुल येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात कार्यक्रमाचे मुख्य आयोजक समता परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले यांचे नेतृत्वात विविध उपयुक्त वृक्षाचे रोपण ज्येष्ठ समाज बांधव तथा महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, ज्येष्ठ नागरिक परशुराम शेंडे, ज्येष्ठ पत्रकार व माजी नगरसेवक गुरु गुरनुले, प्राध्यापक डॉ. केवल कऱ्हाडे, देवराव ढवस, युवराज चावरे, ईश्वर लोनबले,राकेश मोहरले, युवक कार्यकर्ते सौरभ वाढई , दुशांत महाडोळे, ओमदेव मोहरले, प्रतीक गुरनुले, प्रशांत भरतकर, दिलीप वार्जुकर, अंकुश वाकुडकर,विजय दुर्गे यांचेसह समता परिषदेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
याच निमित्त उपजिल्हा रुग्णालयात विविध आजारांनी भरती असलेल्या रुग्णांना तसेच बाळत पणाने भरती असलेल्या अनेक महिलांना शस्त्रक्रीया झालेल्या रुग्णांना समता परिषदेच्या उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे हस्ते विविध फळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रुग्णालयातील उपस्थितवैद्यकीयअधिकारी,नर्स,कर्मचारी यांचेही या कार्याला सहकार्य लाभले.