News34 chandrapur
चंद्रपूर - UGC महाविद्यालय अभ्यासक्रमात योग हा विषय शिकविण्यात यावा अशी मागणी योगगुरू डॉ. शिल्पा चन्ने यांनी गोंडवाना विद्यापीठ कुलगुरू डॉ. बोकारे यांना निवेदनामार्फत करण्यात आली.
21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, योग हा मानवी जीवनाला वरदान म्हणून प्राप्त आहे.
योग मध्ये कर्म योग, ज्ञान योग, भक्ती योग व क्रिया योग हे चार प्रकार आहे.
योग क्रिया हे मानसिक व शारीरिक स्वास्थसाठी अत्यंत लाभकारी आहे, म्हणून याबाबत सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळावी करीत योग हा विषय अभ्यासक्रमात सामील करीत त्याचे ऑनलाइन क्लास सुरू करावे.
देशात हजारो वर्षापासून सुरू असलेली शरीराला लाभदायक माहितीचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल याकरिता योग गुरू डॉ. शिल्पा चन्ने यांनी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन देत मागणी केली, डॉ. बोकारे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत लवकर पाठपुरावा करीत मागणी पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली.