News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल तालुक्यातील तीन ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकांचा निकाल नुकताच हाती आला असून तीनही ग्रामपंचायतीच्या निवडणुका साठी भाजपा व काँग्रेसने पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दोन्ही पक्षाचे नेते प्रतिष्ठा पणाला लावली होते. आज लागलेल्या तिन्ही ग्रामपंचायत निवडणूक निकालात काँग्रेसने ताडाळा, टोलेवाही या दोन ग्रामपंचायतीवर विजय मिळवत वर्चस्व कायम ठेवले तर भगवानपूर ग्रामपंचायत वर भाजपाने विजय मिळविला. Grampanchayat election result
तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा जि. प. माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात व माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांचे मार्गदर्शनात काँग्रेसने दोन ग्रामपंचायतीवर विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले आहेत. यात ताडाळा येथे काँग्रेसचे राहुल मुरकुटे यांनी अपक्ष योगेश चौधरी यांचा 90 मतांनी पराभव केला तर टोलेवाही येथे काँग्रेसच्या वैशाली निकोडे यांनी भाजपच्या सुनिता लेनगुरे हिचा 5 मतांनी पराभव केला तर भगवानपूर येथे भाजपाच्या सचिन दशरथ गरमडे यांनी काँग्रेसचे अजय वासुदेव नैताम यांचा दहा मतांनी पराभव केला. Election result 2022
विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा गृह क्षेत्रातील मुल तालुक्यातच काँग्रेसने बाजी मारत भाजपाला धक्का दिला आहे. विशेष म्हणजे चिंचाळा केळझर या जिल्हा परिषद पंचायत समिती गणात या तिन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या या क्षेत्रात भाजपच्या ताब्यात जि. प. व प. स. सदस्य असून निर्विवाद दशकापासून वर्चस्व आहे. असे असले तरी ग्रामपंचायत हातून गेल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाजपाला धोक्याची घंटा दिसत आहे. काँग्रेसच्या ताब्यात आलेल्या ताडाला व कांतापेठ या दोन्ही निवडून आलेल्या ग्राम पंचायत सरपंच व सदस्य यांचा सत्कार तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांचे हस्ते करण्यात आला.