News34 chandrapur
चंद्रपूर - राहुल गांधी भारत जोडो यात्रा घेऊन कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण करीत आहे, अगदी सामान्य माणसांना जोडण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. Congress news
मात्र चंद्रपूरमध्ये सामान्य कुटुंबातील एका मुस्लीम समाजातील कार्यकत्याची NSUI पदी नियुक्ती झाली असताना काही बड्या नेत्यांनी वजन वापरून अवघ्या 24 तासातच नियुक्ती रद्द केली आहे. यामुळे मात्र मुस्लीम समाजामध्ये नाराजी असून त येणाऱ्या महापालिका निवडणूक तसेच अन्य निवडणूकानावर काँग्रेसला त्याचा फटका बसण्याची जोरदार चर्चा चंद्रपूर मध्ये सुरू आहे.

ऑटो रिक्षा चालकाचा मुलगा NSUI च्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त होऊ शकत नाही का, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे.
चंद्रपुरातील बड्या नेत्याने आपलं वजन दाखवीत शफाक शेख याच्या नियुक्तीला आवाहन देत सरळ पद रद्द केले.
शफाक शेख यांच्या नियुक्तीवर मुस्लिम समाजातील एका सामान्य कार्यकर्त्याला पद दिले याचा आनंद झाला मात्र तो आनंद 2 दिवसाचा होता.
शफाक शेख यांची नियुक्ती रद्द करीत त्या पदावर यश दत्तात्रय यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे मुस्लिम समाज चांगलाच नाराज झाला आहे.
मुस्लिम समाजातील नाराजीचा सूर येणाऱ्या चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत कांग्रेसला बसण्याची शक्यता आहे.
मागील चंद्रपूर विधानसभेच्या निवडणुकीत कांग्रेसची जमानत जप्त झाली होती, शहरात कांग्रेसला गळती सुरू झाली, त्यांनंतरही कांग्रेस पक्षात घराणेशाही सुरुच आहे, कार्यकर्त्याना न्याय न देता स्वतः च्या घरातील व्यक्तींना नेता बनविण्याची कांग्रेस पक्षात जणू स्पर्धाचं सुरू आहे.
यश दत्तात्रय यांचे वडील विनोद दत्तात्रय हे महाराष्ट्र कांग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीत आहे.
येणारी निवडणूक कांग्रेस पक्षासाठी सोपी नसणार आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यातील खासदार, आमदार यांना मुस्लिम समाजाने मतरुपी बरीच मदत केली आहे. मात्र अवघ्या 24 तासातच मुस्लिम समाजातील युवकाची नियुक्त रद्द केल्याने, काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात बरीच चर्चा सुरू झाली आहे.