News34 chandrapur
चंद्रपूर - 3 महिन्यांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला, अडीच वर्षे सुरळीत चाललेल्या महाविकास आघाडी सरकारला शिवसेना पक्षातील एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत सरकार पाडली.
त्यांनतर शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करीत सत्ता स्थापन केली, शिंदेच्या बंडाचा फटका शिवसेनेला बसला, अनेक आमदार, खासदार व पदाधिकारी शिंदे गटात गेले, त्यांनतर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्वतः शिवसेना पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. Political breaking
आज राज्यात उद्धव ठाकरे यांच्याबाबत जनमानसात आपुलकीची लाट आहे, शिंदे सरकार ही खोके सरकार आहे असा आरोप अनेकदा विरोधकांनी केला मात्र चंद्रपूर जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटातील शिवसेना जिल्हा संघटिका उज्वला नलगे यांनी कोळसा व्यापाऱ्यांकडून 5 लाखांची खंडणी मागितली असा आरोप झाला, नलगे विरोधात खंडणी चा गुन्हा दाखल झाला, त्यांनी याविरोधात जामीन मिळविला, त्यांनतर पक्षप्रमुख ठाकरे यांनी तात्काळ नलगे यांची पक्षातून हकालपट्टी केली पण 2 दिवसात ठाकरे यांना तो निर्णय परत घ्यावा लागला व पून्हा नलगे यांची जिल्हा महिला संघटिका पदावर नियुक्ती करावी लागली.
ठाकरे गटावर पहिल्यांदाच अशी नामुष्की ओढावली असून खंडणीखोर पदाधिकारी त्यांना चालतात अशी चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली. Khoke sena
दुसऱ्यांवर खोके सरकारचा आरोप करता आणि एकीकडे ठाकरे गटातील पदाधिकारी लोकांना पैश्यासाठी नाहक त्रास देतात, तर वसुली सेना कुणाची हा आरोप ठाकरे गटावर चंद्रपूर जिल्ह्यात होऊ लागला आहे. Shivsena thackeray
उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्री पदी असताना त्यांच्या समर्थनाची लाट चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झाली होती मात्र त्यांच्या निर्णयामुळे शिवसेना किती पदाधिकाऱ्यांसाठी हतबल तर नाही झाली न असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मात्र या निर्णयाच्या मागे पाठबळ कुणाचं जेणेकरून ठाकरे गटाला पुन्हा नियुक्ती करण्यास भाग पाडले.
ठाकरे गटांचे खंडणीखोरीला तर समर्थन नाही ना?
