News34 chandrapur
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा हा औद्योगीक जिल्हा असल्याने येथे सर्वसामान्य व गरीब कुटुंबाचे देखील मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. उद्योगाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदुषणामुळे या जिल्हयातील लोकांना विविध आजाराने ग्रासले आहे. या विविध आजारांसह या जिल्हयातील जवळपास ५ हजारांहून जास्त रुग्णांना किडणीचे आजार मोठ्या प्रमाणात झालेले आहे. किडणीचे आजार होऊन एक स्तरावर वाढल्यानंतर त्या रुग्णांना नियमितपणे डायलिसीस करावे लागते.
Dialysis
त्याच अनुषंगाने चंद्रपूरमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात सध्यास्थितीत जवळपास ९ डायलिसीस मशीन असून त्यापैकी फक्त ८ डायलिसीस मशीन या कार्यरत आहे. यामुळे रुग्णांच्या तुलनेत मशिन अपुऱ्या पडत असल्याने तात्काळ अतिरिक्त १० डायलिसिस मशीन वाढवा या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांनी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चे अधिष्ठाता मा. डॉ. अशोकजी नितनवरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिले.
Kidney disease
आज चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात होणाऱ्या रुग्णांच्या डायलिससची आकडेवारी काढली तर एका दिवसात जवळपास २२-२३ रुग्णांचे डायलिसीस या ८ मशीनवर प्रति दिवस होत असून एका रुग्णाला साधारणतः ३.३० तास लागतो आहे. सदर रुग्णांना एकदा डायलिसीस सुरू झाली तर आठवडयातून किमान २ दा व महिन्यातून किमान ८ दा हा उपचार करावाच लागतो.
Ncp news
आज चंद्रपूर जिल्हयातील रुग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत असून सोबतच या उपचाराकरिता लगतच्या गडचिरोली व यवतमाळ तसेच काही प्रमाणात तेलंगाणा राज्यातील रुग्ण सुध्दा येत असल्याने चंद्रपूर शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात उपस्थित असलेल्या ८ डायलिसीस मशीन या अपुऱ्या पडत आहे.
Chandrapur medical college
जिल्ह्यातील अनेक रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात ही सुविधा मिळत नसल्याने खाजगी दवाखान्यात एका दिवसाचे जवळपास ३ हजार ५०० रुपये देऊन उपचार करावे लागत आहे. सदर खर्च हा सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना परवडण्यासारखा नसुन आर्थिक कारणांमुळे अनेक रुग्ण हे मृत्यूच्या दारात ढकलले जात आहे.
चंद्रपूर शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात येणारे रुग्ण जर महात्मा ज्योतीबा फुले या योजने अंतर्गत पात्र झाले तर सदर पात्र रुग्णांना डायलिसीसची मोफत सुविधा देण्यात येते आणि जे रुग्ण या योजनेत बसत नाही मात्र त्यांच्या कडे शिधापत्रीका असुन या रुग्णांचा उपचाराकरीता नंबर लागला तर त्या रुग्णांना मात्र प्रति डायलिसीस फक्त २७० रुपये एवढाच खर्च आहे.
व म्हणून चंद्रपूर वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात तात्काळ किमान १० अतिरिक्त डायलिसीस मशीन व यंत्रणा वाढविण्यात यावी, याबाबतचे निवेदन मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, पालकमंत्री, मा.श्री.बाळूभाऊ धानोरकर , खासदार, चंद्रपूर लोकसभा क्षेत्र, चंद्रपूर मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार, माजी पालकमंत्री तथा आमदार, विधानसभा क्षेत्र, ब्रम्हपुरी, मा. श्री. किशोरभाऊ जोरगेवार, आमदार, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र, चंद्रपूर मा. श्री. सुभाषभाऊ धोटे, आमदार, राजुरा विधानसभा क्षेत्र, राजुरा मा. सौ. प्रतिभाताई धानोरकर, आमदार, भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्र, मा. श्री. बंटीभाऊ भांगडीया, आमदार, चिमुर विधानसभा क्षेत्र, मा. श्री. अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर. मा. श्री. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर व मा.श्री.डॉ.अशोक नितनवरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर यांना सदर मागणीचे निवेदन देऊन चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांकरीता तात्काळ या डायलिसिस मशीन ऊपलब्ध करून देण्याकरिता पाठपुरावा करावा ही विनंती करण्यात आली.
सदर निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात दिले असून यावेळी पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शेजुळ, मा. सरपंच अमोल ठाकरे, नितीन घुबडे, रोशन फुलझेले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, सौरभ घोरपडे, ग्रा.प. सदस्य अनुकूल खंन्नाळे हे उपस्थित होते.