News34 chandrapur
मुंबई - निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह व नाव गोठविल्याने नवा पेच निर्माण झाला होता, शिवसेना आमचीच असा दावा शिंदे गट व ठाकरे गटाने केल्यावर निवडणूक आयोगाने सरळ नाव व चिन्ह गोठवून टाकले.
ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला नव्या चिन्हाबाबत पर्याय दिले मात्र आता थेट दिल्ली हायकोर्टात ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आवाहन दिले. Shivsena
या याचिकेवर आजच तातडीची सुनावणी होते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण अखेर याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलीय. Udhav thackeray
दिल्ली हायकोर्टात शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असल्याचं कळतंय. विशेष म्हणजे आज तातडीची सुनावणी घेतली जाणार नाही, हे स्पष्ट झालंय. शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय स्थगित करावा, या प्रमुख मागणीसाठी ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केलीय. High court
शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर आजच सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली होती. शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी याबाबत सविस्तर भूमिकाही मांडली होती. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घाईघाईने घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह या दोन्हीबाबत महत्त्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आज घेण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी प्रत्येकी तीन-तीन पर्यायही शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटाकडून देण्यात आलेत