News34 chandrapur
माजरी - मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात वाढ होत असून आतापर्यंत अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. Tiger attack
मूल, ब्रह्मपुरी व सावली नंतर माजरी येथे ऐन दिवाळीच्या सणावर 24 ऑक्टोम्बरला नागरी वस्तीत वाघाने एकावर हल्ला करीत ठार केले.
मृतक 37 वर्षीय दिपू सियाराम सिंग महतो हा खाजगी कंपनीमध्ये कार्यरत होता, रात्र पाळी असल्याने तो राहते घर न्यू हाऊसिंग कॉलोनी येथून जात होता. Tiger in human habitat
त्यावेळी अचानक एका घरामागे वाघ दबा धरून बसला होता, त्याचवेळी वाघाने दिपू वर हल्ला चढवीत त्याला फरफटत झुडपात नेत त्याच्या नरडीचा घोट घेतला. Human conflict with wildlife
या हल्ल्यात दिपू ठार झाला असून नागरिकांना ज्यावेळी दिपू चा ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी धाव घेत, शोधाशोध केली असता नाल्याजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.
मागील काही दिवसांपासून तो वाघ वेकोली क्षेत्र व नागरी वस्तीत अनेकांना दिसला आहे, मात्र वनविभाग व वेकोली प्रशासन अनुचित घटना होण्याची वाट बघत होते.
ज्या रस्त्यावरून दिपू कामाला जात होता, त्या रस्त्यावर ग्रामपंचायत ने साधे लाईट सुद्धा लावले नाही, त्या मार्गावर गडद अंधार होता. Breaking news
प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे दिपू वाघाचा बळी ठरला. नागरी वस्तीमध्ये वाघाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
