News34 chandrapur
गोंडपीपरी - दिवाळी सण आला की नागरिक सुट्ट्याच्या लगबगीत लागतात, गावाला जायची दगदग वाढते. Chain snatching
मात्र या दगदगीच्या काळात गुन्हेगारीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते, 29 ऑक्टोम्बर शनिवारला अहेरी वरून चंद्रपूर व चंद्रपूर वरून सिरोंचाकडे जाणाऱ्या परिवहन विभागाच्या बस मध्ये अज्ञात चोरट्यानी 2 महिलांकडे असणारी रोख रक्कम व सोन्याची चैन लांबवली.
रक्कम व चैन लांबविण्याची बाब महिलांना कळताच बस थांबवित याबाबत गोंडपीपरी पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी ती बस पोलीस ठाण्यात आणत प्रवाश्यांची कसून चौकशी केली.
दुसऱ्या बसमधील प्रवाश्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली. Crime news
पुढील तपास गोंडपिपरीचे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पटले,जमादार गोकुलदास मडावी हे याप्रकरणाचा तपास करित आहे.