News34 chandrapur
माजरी - 24 ऑक्टोबर दिवाळीचा दिवस, एकीकडे नागरिक दिवाळीचा सण साजरा करण्यात व्यस्त होते तर दुसरीकडे एक नरभक्षक शिकार करण्याच्या तयारीत बसला होता. Chandrapur police
रात्रीचे 9 वाजले एक कामगार रात्रपाळीत कर्तव्यावर निघाला होता वाटेत अंधाराचे साम्राज्य आणि अचानक एक नरभक्षक वाघाने त्याच्यावर झेप घेत त्याला फरफटत नेले.
सदर घटना ही माजरी येथील न्यू हाऊसिंग कॉम्प्लेक्स परिसरात घडली, मागील काही महिन्यांपासून वाघ माजरी येथील काही भागात दिसत होता मात्र वनविभागाने त्याला जेरबंद केले नाही. Sp chandrapur
24 ऑक्टोम्बरला 39 वर्षीय दिपू महतो या इसमाला वाघाने ठार केले, त्यांनतर वनविभागाला जाग आली, विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले.
मात्र अजूनही तो वाघ जेरबंद झाला नाही, पुन्हा वाघाचा हल्ला होऊ नये यासाठी माजरी पोलिसांनी आपल्या हाती सूत्र घेतले, आणि सुरू केला रात्र पहारा. Tiger attack in chandrapur
माजरी पोलिसांनी पथक तयार करीत शहरातील विविध ठिकाणी सुनसान भागात पोलीस हातात मशाल घेत पहारा देऊ लागले.
नागरिकांच्या रक्षणासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी हातात मशाल घेत कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी सदैव प्रयत्नशील आहे.