News34 chandrapur
चंद्रपूर - मूल येथे राहणारे 34 वर्षीय डेव्हिड दिवाकर निमगडे हे 9 ऑक्टोम्बरला चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील गौरी तलाव वार्डात जावई व बहिणीला भेटायला आला होता.
त्यानंतर डेव्हिड ने आपली दुचाकी MH34 BN 8001 बहिणीच्या घरासमोर लावून नागपूरला कामानिमित्त निघून गेला. Chandrapur crime news
10 ऑक्टोम्बरला डेव्हिड चंद्रपूरला परत आला, त्यानंतर त्याने बहिणीच्या घरी दुचाकी वाहन आणायला निघून गेला मात्र त्याठिकाणी डेव्हिड चे दुचाकी वाहन आढळून आले नाही.
दुचाकी वाहनाचा इतरत्र शोध घेतला मात्र वाहन कुठेही आढळून आले नाही, दुचाकी चोरी गेली असेल असा अंदाज डेव्हिड च्या जावई व बहिणीने लावला असता डेव्हिड ने तात्काळ चंद्रपूर पोलीस स्टेशन गाठत दुचाकी चोरीची तक्रार नोंदविली. Chandrapur police
शहर पोलीसानी गुन्हा दाखल करीत पोलीस कर्मचारी चेतन गज्जलवार यांचेकडे सदर गुन्ह्याचा तपास दिला.
त्यानंतर आरोपीचा व दुचाकी वाहनाचा शोध घेण्यासाठी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी याबाबत चौकशी करीत पुढील तपास सुरू केला.
मुखबिर मार्फत निर्मल यांना माहिती मिळाली की एक युवक गाडी विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचत 19 वर्षीय करण इंदुल निषाद याला अटक केली. Two wheeler thief
बाबूपेठ भागातून चोरी केलेले वाहन करण हा 40 हजार रुपयांना विकणार होता मात्र त्याआधी पोलिसांनी त्याला अटक केली.
आरोपीला पोलिसी खाक्या दाखवीत चौकशी केली असता त्याने चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत त्याच घटनास्थळावरून दुचाकी वाहन क्रमांक MH34 BQ 5255 किंमत 35 हजार रुपये चोरल्याची कबुली दिली, शहर पोलिसांनी दोन्ही दुचाकी वाहन आरोपी करण कडून जप्त केली.
विशेष म्हणजे आरोपी करण हा दुचाकी वाहन चोरण्यासाठी अल्पवयीन बालकांचा वापर करीत होता, आरोपीला पोलिसांनी अटक करीत 2 दुचाकी सहित 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार व पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सपोनि जयप्रकाश निर्मल, सपोउपनी शरीफ शेख, महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, जयंता चुनारकर, चेतन गज्जलवार, सचिन बोरकर, इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद खान, रुपेश रणदिवे यांनी पार पाडली.