News34 chandrapur
भंडारा - भंडारा जिल्ह्यातून काळीज पिटविणारी घटना पुढे आली असून यामध्ये आईने आपल्या 2 चिमुकल्यासमवेत नदीत उडी घेत आत्महत्या केली, यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तिड्डी गावात घडली.
27 वर्षीय शितलकुमार खंगार असे मृत महिलेचे आणण आहे.
शीतल सोबत 3 वर्षीय देवांशी खंगार, दीड वर्षीय वेदांशी खंगार यांचा मृत्यू झाला.
आईनं स्वतःसह आपल्या दोन मुलींचाही जीव घेण्याचं हे धक्कादायक पाऊल नेमकं का उचललं हे अद्याप समजू शकलेलं नाही . तिड्डी गावातील रहिवासी दीपाली हिने आपल्या दोन मुलींसह काल रात्री 12 वाजता तिड्डी येथून जाणाऱ्या वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती कारधा पोलिसांना मिळताच पोलिसांनी शोध सुरू केला. आज सकाळी त्या तिघांचा मृतदेह सापडला आहे. यानंतर लगेचच मृतदेह शवविच्छेदनाकरता भंडारा सामान्य रुग्णालय दाखल करण्यात आले. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या तपासानंतरच आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल.