News34 chandrapur
मुंबई - शिवसेनेतून 40 आमदार व 12 खासदार यांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत महाविकास आघाडी सरकार पाडत भाजपसोबत हातमिळवणी केली, व राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करीत शिंदे मुख्यमंत्री बनले. Shivsena
यानंतर सुरू झाली पक्ष व चिन्हांची लढाई, शिंदे गटाने शिवसेना ही आमचीच आहे असा दावा केला तर दुसरीकडे शिवसेना ही आमचीच आहे, त्यावर शिंदेचा अधिकार नाही असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. Bow And Arrow
आधी सुप्रीम कोर्ट तर आता निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण पोहचले मात्र निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठविले असल्याची घोषणा केली. Shinde group
अंधेरी येथे होणारी विधानसभेची पोटनिवडणूक शिंदे व ठाकरे गटाला धनुष्यबाण याविना लढावी लागेल व विशेष म्हणजे शिवसेना नाव दोन्ही गटाला लावता येणार नाही असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
पक्षाला पर्यायी नाव काय याबाबत पुन्हा नवा पेच निर्माण झाला आहे. Election commission
शिंदे व ठाकरे गटाने एकच नाव दिल्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे, दोन्ही गटाने शिवसेना-बाळासाहेब ठाकरे हे पर्यायी नाव मागितले आहे.
दोन्ही गटाने शिवसेना-बाळासाहेब ठाकरे या नावावर दावा केला आहे. Shivsena-balasaheb thackeray
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशात दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई करण्यात आली. मात्र, शिवसेना या नावाच्या पुढे उपनाम जोडता येणार आहे. त्यानुसार शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाने आता आपल्या गटासाठी एकच नाव सुचवले आहे. दोन्ही गटांनी 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे' या नावाची मागणी केली आहे. आता, दोन्ही गटाने मागणी केल्याने निवडणूक आयोगाकडून हे नावदेखील गोठवण्यात येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना सोमवारी, 10 ऑक्टोबर रोजी, दुपारपर्यंत उपलब्ध असलेले निवडणूक चिन्ह निवडण्यास सांगितले आहे. Maharashtra politics shivsena
