News34 chandrapur
चंद्रपूर - स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह दिनांक ७ व ८ऑक्टोबरला पार पडलेल्या प्रादेशिक स्तरिय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत- चंद्रपूर परिमंडळ द्वारा सादर ' तो परत आलाय ', नाटकाने नाट्य निर्मितीसह, दिग्दर्शनाचे प्रथम, उत्कृष्ट अभिनय 'स्त्री', अभिनय 'पुरुष' या श्रेणीत प्रथम, 'प्रकाशयोजना'-प्रथम व 'रंगभूषा व वेशभूषा '-प्रथम तसेच 'नेपथ्य 'चे द्वितीय क्रमांक पटकावत बाजी मारून दोन्ही दिवस आनंदाचे क्षणांची उधळण करणाऱ्या या नाट्यस्पर्धेत नाट्यरसिकांची व परीक्षकांची मने जिंकत 'प्रथम' क्रमांक पटकावला.
हा उदघाटन सोहळा, प्रमुख अथिती- माननीय श्री. अरविंद भादीकर, कार्यकारी संचालक (वितरण ) सांघिक कार्यालय, मुंबई,यांच्या शुभहस्ते, श्री. सुहास रंगारी, (प्रादेशिक संचालक), महावितरण, नागपूर परिक्षेत्र, यांच्या अध्यक्षतेत , मा. श्री. सुनिल देशपांडे, (मुख्य अभियंता) चंद्रपूर परिमंडळ, (स्वागताध्यक्ष), मा. श्री. दिलीप दोडके, (मुख्य अभियंता), नागपूर परिमंडळ, मा. श्री. राजेश नाईक, मुख्य अभियंता( गोंदीया परिमंडळ), श्री. अनिल डोये मुख्य अभियंता( अकोला परिमंडळ),श्री. शरद दाहेदार, महाव्यवस्थापक (वि . व ले. ), नागपूर, अधीक्षक अभियंता - श्री. हरीष गजबे,श्रीमती.संध्या चिवंडे,श्री.रवींद्र गाडगे, श्री.अमित परांजपे, श्री.सुहास म्हेत्रे, चंद्रपूर,श्री. रुपेश देशमुख, महाव्यवस्थापक(मा. स.), श्री. मधुसूदन मराठे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी बोलतांना श्री. भादीकर म्हणाले, " जीवन जगतांना, जीवन जगणेही एक कला आहे. प्रत्येकात काही सुप्त गुण असतात. या गुणांची, कलेची, छंदांची जोपासना केली तर जीवन अतिशय सुंदर होत असते, त्यामुळे प्रत्येकाने आपला छंद जोपासावा व त्यातून आपली व काम करीत असलेल्या संस्थेची प्रगती साधावी. व याच हेतूने प्रेरित मा. श्री. विजय सिंघल (भा.प्र.से.), (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक), महावितरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनात या नाट्यस्पर्धा होत आहेत. महावितरण च्या अधिकारी कर्मचारी यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी नाटक, खेळ आदी स्पर्धाॅंचे आयोजन केल्या जाते, त्यातून त्यांनी आनंदाची शिदोरी जपावी."
प्रादेशिक संचालक श्री. सुहास रंगारी, यांनी सर्व कलावंतांचे कौतुक करतांना, -"हसता हुआ चेहरा आपकी शान बढाता है, और हसते हुये किया गया काम आपकी पहचान बढाता है ", असे प्रतिपादन करुन, कर्मचारी -कलावंतांचे मनोधैर्य वाढवले.
दोन दिवस चाललेल्या नाट्यस्पर्धेत कलावंतांच्या कलेचा सर्वोत्तम परिचय देत कला सादरकर्त्या कलावंतांच्या कलेचे, नाट्यपरिक्षक म्हणून अजय धवणे, जयदेव सोमनाथे व श्रीमती रोहिणी उईके यांनी जबाबदारी पार पाडली.
चंद्रपूर परिमंडळद्वारा सादर,' तो परत आलाय ’ या सुरुवात होवून ‘अचानक’ हे नाटक नागपूर परिमंडळ व महादेवा जातो गा’ अकोला परिमंडळाद्वारा, भर चौकात गांधी पुतळ्यासमोर’ गोंदीया परिमंडळाद्वारा आणि ‘पांडगो इलो रे बा इलो’ हे नाटक अमरावती परिमंडळाद्वारा सादर करण्यात आले.
नाट्यस्पर्धेतिल विजेते कंसात- स्पर्धकाचे नाव व परिमंडळाचे नाव -
निर्मिती प्रथम - ‘तो परत आलाय ’( मुख्यअभियंता श्री. सुनिल देशपांडे,चंद्रपूर ), उपविजेते – ‘महादेवा जातो गा ’ ( अनिल डोये, मुख्यअभियंता, अकोला );
दिग्दर्शन: प्रथम – 'तो परत आलाय'( सुहास म्हेत्रे, अधि. अभियंता,चंद्रपूर ), 'महादेवा जातो गा' उपविजेते- ( गणेश बंगाळे, अकोला );
अभिनय पुरूष: प्रथम - 'तो परत आलाय '( मिथुन मेश्राम,चंद्रपूर ); द्वितीय- 'भर चौकात गांधी पुतळ्यासमोर ( नावेद शेख,गोंदिया );
अभिनय महिला: प्रथम -'तो परत आलाय ' (सायली सायंकार , चंद्रपूर); द्वितीय- 'महादेवा जातो गा '(ज्योती मुळे, अकोला )
रंगभूषा व वेशभूषा: प्रथम - 'तो परत आलाय '( ईशा गेडाम,चंद्रपूर),द्वितीय-'पांड गो इलोरे बा इलो '(किरणकुमार पवार, अमरावती ) संगीत: प्रथम -'महादेवा जातो गा' (योगेश सोनवणे, अकोला ), द्वितीय- 'अचानक'( अमित पेडेकर,नागपूर ), प्रकाश योजना: प्रथम - 'तो परत आलाय '( रवींद्र गाडगे ,चंद्रपूर), द्वितीय-'अचानक '(प्रदीप सातपुते नागपूर,परिमंडळ), नेपथ्य: प्रथम - 'महादेवा जातो गा' ( विवेक वाघ, अकोला ), द्वितीय- 'तो परत आलाय '( संध्या चिवंडे ,चंद्रपूर)
Theatrical competition
नाट्यस्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयोजन समितीने, समितीचे कार्याध्यक्ष तथा यजमानपाद प्राप्त चंद्रपूर परिमंडळाचे, मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर परिमंडळातील अधिकारी-सर्वश्री - सुशील विखार(सं. महाव्यवयास्थक) , योगेश गोरे( उपमुख्य औ. स. अधि.), कार्य./उपकार्य.अभियंता -विजय राठोड , सचिन घडोले , सुहास पडोळे, महेश तेलंग, विश्लेष लांजेवार, श्री. कापसे व राकेश बोरिवार(व. व्यवस्थापक ), तसेच इतर अधीकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

