News34 chandrapur
गोंडपीपरी - आष्टी जवळील वैनगंगा नदीच्या पुलावरून Scorpio वाहन उलटल्याची घटना दिनांक 17 ऑक्टोबर सायंकाळी पाऊने सहाच्या सुमारास घडली. Huge accident
गोंडपीपरी कडून आष्टीकडे येणारे Scorpio वाहन क्रमांक MH 20 DV 3711 वैनगंगा नदीच्या पुलावर येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन नदीत कोसळले.यात चालकाचा जागीच मृत्यू झाला.
हे वाहन नेमके कुणाच्या मालकीचे हे कळू शकले नसून मृत वाहनचालक हा चंद्रपुरातील छोटा नागपूर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. क्रेन च्या साहाय्याने वाहन नदीतून काढण्यात आले आहे.
या गाडीत चालक हा एकटाच होता.घटनेची माहिती कळताच आष्टी व गोंडपीपरी पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे.