News34 chandrapur
चिमूर - तालुक्यातील नेरी जवळ असलेल्या बोळधा येथील तरुण शेतकरी सकाळी शौचास गेला असता शेजारील शेताजवळ वन्यप्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या वीज प्रवाह असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने त्या तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.farmer die
मृतक 37 वर्षीय शेतकरी अमोल देवराव नाकाडे असे त्या तरुणाचे नाव आहे.
बोळधा येथील शेतकरी शामराव घोणमोडे यांच्या शेतात पिकाचे रक्षण करण्यासाठी तारेवर वीजप्रवाह रात्रीच्या सुमारास सोडला जात असल्याची माहिती आहे.
त्या शेतात याआधी रानटी डुकरांचा वीज प्रवाहाचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
वनविभागाने व पोलीस विभागाने व महावितरण महामंडळ ने या गंभीर बाबीची दखल घेऊन तात्काळ दोषींवर कारवाई करून आरोपीची कारागृहात रवानगी करावी अशी मागणी मुतुकाच्या कुटुंबियाणी व गावकऱ्यांनी केली आहे, सदर घटनेने तरुण शेतकऱ्यांचा जीव गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून बोळधा गावात शोककळा पसरली असून पुढील तपास भिसी पोलीस करीत आहे.