News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही- ज्या वेगाने इंटरनेट आणि ऑनलाइन चे जाळे पसरत आहे त्याच वेगाने सायबर गुन्हेगारीतही झपाट्याने वाढ होतेयं. सायबर गुन्हेगार रोज नवनवीन पद्धतींचा वापर करत नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवतंय. यामध्ये ऑनलाईन फ्रॅड, हनीट्रॅप Honeytrap अशा गुन्ह्यांची चर्चा आहे.
मात्र गेल्या काही महिन्यातच एक वेगळाच गुन्हा चर्चेत आलायं. त्यामुळे अनेकांच्या डोक्याला मनस्ताप सहन करावा लागतोय. हा गुन्हा म्हणजे सेक्सटॉर्शन. Sextortion
मात्र गेल्या काही महिन्यातच एक वेगळाच गुन्हा चर्चेत आलायं. त्यामुळे अनेकांच्या डोक्याला मनस्ताप सहन करावा लागतोय. हा गुन्हा म्हणजे सेक्सटॉर्शन. Sextortion
जाणून घेऊ सेक्सटॉर्शन म्हणजे काय?
फेसबुक, व्हॉट्सॲपवर व्हीडिओ कॉलवरून अनोळखी व्यक्तीचा फोन आला, तर तो स्वीकारू नका. व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतर वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून दोन्हीकडील व्यक्तींना नग्न असल्याचे भासवून हा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांपासुन अनेकांना nude call 'न्यूड कॉल्स'च्या माध्यमातून फसवणूक (सेक्सटार्शन) करण्याचा प्रकार सुरू आहे. शहरातील तरुणाला अनोळखी तरुणीने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ती स्वीकारल्यानंतर दोघेही एकमेकांशी चॅटिंग करू लागले. एकमेकांच्या मोबाइल क्रमांकाची देवाणघेवाण झाल्यानंतर व्हॉट्सॲपवर व्हीडिओ कॉलवर बोलणे सुरू झाले. तरुणीच्या बोलण्याला भुलून तरुणाने तिला अश्लील चाळे करून दाखविले. तिने तो कॉल रेकॉर्ड करून त्यात छेडछाड करून तरुणाला धमकी देऊ लागली. बदनामीच्या भीतीने या तरुणाने काही रक्कम तिला दिली. मात्र पैशाची मागणी थांबत नसल्याने त्याने पोलिसांत धाव घेतली आहे. Crime news
सिंदेवाही पोलीस निरीक्षक घारे
पॉर्न साइट्स सर्च करू नका. फक्त सुरक्षित वेबसाइट उघडा.
ज्या वेबसाइटची URL लॉक करण्यापूर्वी बनवली आहे त्या वेबसाइटवर जा.
लाल लॉकने चिन्हांकित केलेली वेबसाइट उघडणे टाळा.
फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी ती नीट तपासा.
जर कोणी ब्लॅकमेल करत असेल तर सायबर पोलिसांकडे तक्रार करा.
सिंदेवाही पोलीस उपनिरीक्षक महल्ले
फेसबुक, व्हॉट्सॲपवर व्हीडिओ कॉलवरून अनोळखी व्यक्तीचा फोन आला, तर तो स्वीकारू नका. व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतर वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून दोन्हीकडील व्यक्तींना नग्न असल्याचे भासवून हा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जात आहेत. सर्वसामान्य नागरिक पासुन अनेकांना फसवणूक (सेक्सटार्शन) करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हा.