News 34 chandrapur
चंद्रपूर: बाबुपेठ परिसर मध्ये अनेक समस्या असून त्याकडे मनपा प्रशासन तथा लोकप्रतिनिधी चे अक्षरशः दुर्लक्ष होत आलेले आहेत.
त्यामुळे येथील जनता पारंपरिक राजकीय नेते तथा पक्षाना यावेळेस धडा शिकवण्याचा भूमिकेत आहे याचा फायदा नवीन पक्षांना होताना दिसत असून आम आदमी पार्टी ची तथा केजरीवाल यांच्या कामाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. Political news
बाबुपेठ मध्ये आम आदमी पार्टी चे कार्यकर्ते घरोघरी जाऊन केजरीवाल यांच्या शिक्षण आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कामाचे धडे लोकांना सांगत असून याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. आम आदमी पार्टीचे बाबुपेठ मनपा निवडणूक सह प्रभारी राजु कुडे यांनी जिथे वार्ड तिथे आप ही संकल्पना हाती घेतल्यामुळे अनेक वॉर्डांत आपची कमिटी गठित करण्यात आलेली आहे असेच बाबुपेठ मधील शेडमाके सभागृह फुले चौक येथे आपचे शुभम गेडाम यांचा नेतृत्वात असंख्य युवकांनी तथा महिलांनी आम आदमी पार्टीची सदस्यता घेवून कमिटी गठित करण्यात आली. Aap chandrapur
यावेळेला आपचे शहर सचिव मनपा सहप्रभारी राजु कुडे, महिला शहर संघटन मंत्री सुजाता बोदेले, झोन संयोजक रहेमान खान, झोन सह संयोजक अजय बाथव, जयदेव देवगडे, प्रभाग संयोजक अनुप तेलतुंबडे, युथ विंग शहर सचिव कालिदास ओरके, कृष्णा सहारे, पंकज तेलसे, चंदु माडुरवार तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
