News34 chandrapur
चंद्रपूर - महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात सर्वात मोठी जवळपास १२ हजार ५०० पदांची पोलिस शिपाई संवर्गातील भरती जाहीर केली होती. परंतु आज शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकीय कारण देत पोलिस भरती स्थगित केली आहे असे आदेश काढले. Police recruitment 2022 cancelled
एकीकडे महाराष्ट्रातले वेदांता फॉक्सकॉन, टाटा एयरबस Tata Airbus या संबधातील मोठी गुंतवणूक असलेले उद्योगधंदे पाठोपाठ गुजरातला नेऊन राज्यातील तरुणांच्या हक्काचा रोजगार हिरावून घेत आहेत. हा मोठा अन्याय राज्यातील तरुणांवर होत असताना आज महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काची जी नोकरी वेळेत द्यायला पाहीजे होती ती नोकरी सुद्धा शिंदे-फडणवीस सरकार देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे.
Ncp youth congress
शिंदे-फडणवीस सरकारने आज प्रशासकीय कारन देत स्थगित केलेल्या पोलिस भरतीची तारीख लवकरात लवकर जाहिर जाहीर करावी अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे राज्यशासना विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांनी दिला आहे.