News34 chandrapur
गोंडपीपरी - चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून आता वन्यजीव मानवी वस्तीत शिरकाव करीत शिकार करीत आहे. Wild bear
ऐन दिवाळीत माजरी येथे मानवी वस्तीत वाघाने घुसखोरी करीत एकाला ठार केले, चंद्रपूर शहरातील वडगाव प्रभागात अस्वल फिरताना दिसत होती. Human Wildlife Conflict
आधी मानव वन्यजीवांच्या क्षेत्रात घुसखोरी करीत होता तर आता वन्यजीव मानवी वस्तीत येत आहे.
29 ऑक्टोम्बरच्या रात्री गोंडपीपरी शहरात अस्वल मुक्त संचार करीत असतानाचे क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले, सदर व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्यावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, शिवाजी चौकातील सुनील झाडे यांच्या किराणा दुकानालगत असलेल्या मार्गावर अस्वल बिनधास्त फिरत आहे. Viral video
वनविभागाने आता सतर्कता दाखवावी. व नागरिकांना दिलासा द्यावा.अशी मागणी समोर येत आहे.