News34 chandrapur
चंद्रपूर - महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी २८९ कोटीच्या घरात पोहेाचल्याने थकबाकीदारांविरोधात वसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम जोरात राबविण्यात येत आहे. Msedcl
महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचारी वसुली कामात मैदानात उतरले आहेत. ग्राहकांचा थकबाकीसाठी वीजपुरवठा ख्ंडीत करण्यात येवून गैरसोय् हेावू नये यासाठी सुट्टीच्या दिवशीही सर्व वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत.
महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचारी वसुली कामात मैदानात उतरले आहेत. ग्राहकांचा थकबाकीसाठी वीजपुरवठा ख्ंडीत करण्यात येवून गैरसोय् हेावू नये यासाठी सुट्टीच्या दिवशीही सर्व वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत.
चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडुन ३३ कोटी १७ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन ७ कोटी ७७ लाख येणे आहे, औदयोगिक ग्राहकांकडुन ७ कोटी ३ लाख थकबाकी वसुली येणे आहे, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ३कोटी ४३ लाख तर ग्रामिण व शहरी पथदिवे यांच्याकडून २२३ कोटी ८२ लाख येणे आहेत.
नोटीशीची मुदतही संपल्यामुळे घरगुती ग्राहकांसोबतच आता, थकबाकीत असलेले सरकारी कार्यालये, नगरपालिका व तत्सम थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. Electric bill due
या सहा महिन्यात या सर्व वर्गवारीतील थकबाकीदार ग्राहकांविरोधात सातत्याने वीजपुरवठा ख्ंडीत करण्याची मोहिम सुरु असून आतापर्यंत चंद्रपूर परिमंडळात १८ हजार २७३ थकबाकीदरांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून वसुल केलेल्या पैशातून तसेच कर्ज घेवून वीजखरेदी करून महावितरण ग्राहकांप्रति जबाबदारी पार पाडत वीजखरेदी करून वीजपुरवठा करीत आहे ही वस्तुस्थिती आहे. वीजबिल वुसलीतून प्राप्त पैशामधून ८५ टक्के रककम वीजखरेदीवर केली जाते.
अनेक सेवासांठी आधी पैसे व नंतर सेवा असे असते परंतु महावितरण प्रथम वीजपुरवठा करते व नंतर वीजबिल देते. तरी पण वीजकंपनीच्या अभियंता कर्मचारी वर्गास मारहान, अपमान सहन करून ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरणे अपेक्षित असतांना वसुलीसाठी त्यांच्या दारी जावे लागत आहे. वीजग्राहकांना २४ तास वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण वीज निर्मिती कंपण्याकडून वीजखरेदी करते व वसुल झालेल्या पैशातूनच वीज खरेदी करत असते. वीज निर्मिती कंपन्या कोळसा, नैसर्गिक तेल वीजनिर्मितीसाठी खरेदी करतात व त्यापण कोळसा व तेल कंपण्यांना पैसे देणे लागतात. परंतु वसुलीच झाली नाही तर हे चक्र पूर्णपणे कोलमडणार.
महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेवून ग्राहकांनी थकबाकी भरून महावितरण या आपल्याच कंपनीला सहकार्य करावे असे विनंतीपूर्वक आवाहन मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे यांनी केले आहे.
चंद्रपूर मंडळातील एकूण थकबाकी ११९ कोटी ११ लाख
घरगुती – २० कोटी ९६ लाख, वाणिज्य -६कोटी , औद्योगिक -५ कोटी ४५, पथदिवे -८२ कोटी ३१लाख, पाणीपुरवठा योजना -२कोटी ५२ इतर व सरकारी कार्यालये -१कोटी ८७ लाख अशी एकूण- ११९कोटी ११
…………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………
गडचिरोली मंडळातील एकूण थकबाकी १६९ कोटी ८९ लाख
ग्राहकांची वर्गवारी गडचिरोली मंडल -
घरगुती १२कोटी २१ लाख, वाणिज्य -१कोटी ७८, औद्योगिक - १ कोटी ९१, पथदिवे-१४१कोटी, पाणीपुरवठा योजना -९०लाख, इतर व सरकारी कार्यालये -३कोटी ५९लाख अशी एकूण- १६९कोटी ८९