News34 chandrapur
चिमूर = चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सह पत संस्था मधे करोडो रुपयांची अफरातफर झाली असून माजी व्यवस्थापक व मुख्य लिपिक यांनी हा प्रताप घडवून आणला असून लेखा परीक्षांनातून घोटाळा समोर आला आहे.
Financial scam
Financial scam
चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सह पत संस्था मधे सन २०१२ ते २०२१ या नऊ वर्षात सात कोटी ६५ लाख ५२ हजार रुपयाची अफरातफर झाली, असा आरोप संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि संचालकांनी केला. या संपूर्ण घोटाळ्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे, माजी व्यवस्थापक मारुती पेंदोर, मांनद सचिव अरुण मेहरकुरे, अमोल मेहरकुरे, अतुल मेहेरकुरे, आणि इतरांना संगनमत करून या पत संस्थेत आर्थिक गैरव्यवहार केला असा आरोप पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष पुंडलीक मांढरे, संचालक विनोद शिरपूरवार, उमेश कुंभारे, प्रवीण वैद्य, मोहन हजारे, व्यवस्थापक गिरिधर मोहिंनकर, यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. Bank fraud
पतसंस्थेच्या माजी पदाधीकर्यानी संगनकावर बनावट नोंदी घेतल्या, नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तीच्या नावावर बनावट व्यवहार केले. हा प्रकार दीड वर्षापूर्वी निदर्शनास आला, तेव्हाच पोलिसात तक्रार दाखल केली, सहायक निबंधकानी या कालावधीतील व्यवहाराचे लेखा परीक्षण केले, या लेखा परीक्षणात अरुण मेह्ररकुरे व त्यांच्या परिवारातील सदस्य या आर्थिक गैरव्यवहारात सामील असल्याचे दिसून आले, यात सात कोटी ६५ लाख ५२ हजार ४०८ रुपयांची अनियमितता असल्याचे दिसून आले.
संस्थेच्या मासिक सभेत या घोटळ्याची पोलीस विभागात तक्रार करण्यात आली आहे, या गैरव्यवहारातील रकमेच्या वसुलीचे अधिकार उपलेखा परीक्षक राजेश लांडगे याना देण्यात आले आहे, संस्थेने दिलेल्या अधिकार प्रमाणे चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे,