News34 chandrapur
चंद्रपूर: महात्मा गांधी जंयती व वन्यजीव सप्ताह निमीत्ताने ‘मानव-वन्यप्राणी संघर्ष व स्वच्छता’ या प्रबोधनपर अभियानाची इको-प्रो कडुन सुरूवात करण्यात आली. वन्यजीव सप्ताह मानव-वन्यप्राणी संघर्ष असलेल्या गांव-परिसरात, शहरातील ज्या भागात संघर्ष आहे अश्या परिसरात नागरीकांमध्ये जाउन व्यापक जनजागृती करण्याच्या दृष्टीने अभियान राबविण्याकरीता संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांचे नेतृत्वात सुरूवात करण्यात आलेली आहे. Wild animals
लालपेठ-मातानगर परिसरास लागुन असलेले वेकोलीचे ओवर बर्डन व वाढलेली झाडी झुडपे, त्यास लागुन असलेले मानवी वसाहतीचा परिसरात नेहमी अस्वल, बिबटचा वावर असल्याने कित्येकदा मानवी वसाहतीत दिसुन आल्याने, नागरीकांवर झालेल्या हल्ल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण होणे, प्रसंगी वन्यप्राणी संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने वनविभागाला अनेक प्रयत्न करावे लागते. मात्र सदर वन्यप्राणी मानवी वसाहतीलगत येण्याचे कारणे जाणुन, वनविभाग, महानगरपालीका, वेकोली या विभागा शिवाय नागरीकांनी सुध्दा काय खबरदारी घ्यावी, संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने तसेच मानवी वसाहतीत वन्यप्राणी येउ नये यासाठी नागरीकांनी काये करावे आणि काय करू नये यासाठी सदर परिसरात नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
वन्यजीव सप्ताह, वन्यप्राण्याचे महत्व, मानवी वसाहत वन्यप्राणी पासुन मुक्त कसे राहील या दृष्टीने इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने शासन-प्रशासनासोबत सतत पाठपुरावा व संबधीत विभाग सोबत कार्य केले जात असते. मात्र प्रभावीत होणारा घटक म्हणजे गांवकरी, नागरीक यांना मानव-वन्यप्राणी संघर्ष याविषयी संपुर्ण माहीती असावी. मानव-वन्यप्राणी संघर्ष सुरू झाल्यावर किंवा सुरू असतांना नागरीकांशी संवाद करण्यापेक्षा संघर्षापुर्वी संवाद साधणे योग्य असते. शांततेच्या काळात अशा संवेदनशिल क्षेत्रात वन्यप्राण्याचे महत्व, वन्यप्राणी गांव, शहराकडे येण्याची कारणे आणी नागरीक म्हणुन आपली जवाबदारी ओळखुन मानव-वन्यप्राणी संघर्ष अधिक जाणीवेतुन दुर ठेवणे काळाची गरज आहे, याबाबत वेळोवेळी प्रबोधन होणे आवश्यक असते.
या दृष्टीने आज वन्यजीव सप्ताह निमीत्त मातानगर परिसरापासुन इको-प्रोने सदर अभियानाची सुरूवात केली आहे. सदर परिसरात फिरून संस्थेच्या सदस्यांनी वाघांचे कास्टुम परिधान करून, नागरीकांना एकत्रीत करून वन्यजीव सप्ताह व मानव-वन्यप्राणी संघर्षाची कारणे, उपाययोजना विषयी संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी माहीती देत नागरीकांचे प्रबोधन केले. यावेळी ग्रिन थिंकर गृप सरदार पटेल महाविदयालय चे विदयार्थी, इको-प्रो चे महाकाली विभाग प्रमुख अब्दुल जावेद, जयेश बैनलवार, सुमीत कोहळे, सचिन धोतरे, संजय सब्बनवार, राजु काहीलकर, सुनील मिलाल, प्रितेश जिवने, चित्राक्ष धोतरे, रूद्राक्ष धोतरे उपस्थित होते.