News34 chandrapur
चंद्रपूर / गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीधर निवडणूक 2022 चा 8 सप्टेंबरला मतमोजणी पूर्ण झाली या निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेना प्रणित युवासेनेने निवडणूक लढवली. Gondwana university Senate election result 2022सेक्युलर परिवर्तन पॅनल मधून युवासेनेचे खुल्या प्रवर्गातील अधिकृत उमेदवार प्राध्यापक निलेश रमेश बेलखेडे हे बहुमताने विजयी झाले. राज्यात शिवसेनेमधून अनेकांनी बंड पुकारले, बंडखोरांनी शिवसेनेला संपवायला सुरुवात केली मात्र चंद्रपुरात शिवसेनेने "टायगर अभि जिंदा है" हे वाक्य खरे करून दाखविले. अटीतटीच्या लढतीत मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात सुद्धा चांगलीच चुरस रंगली होती, मात्र निलेश बेलखेडे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत बहुमताने मजल मारली. निलेश बेलखेडे हे शिवसेना प्रणित युवासेनेत अनेक वर्षांपासून सक्रिय आहे, राजकारणासहित बेलखेडे यांचं नाव समाजकारणात मोठं आहे. गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात युवासेनेने सक्रिय सहभाग घेत बेलखेडे यांच्यावर विश्वास टाकला होता. बेलखेडे यांच्या प्रचारार्थ युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई चंद्रपुरात आले होते. शिवसेना, युवासेना व मित्र परिवाराने अथक प्रयत्न करून निलेश बेलखेडे यांना सिनेट निवडणुकीत जिंकून आणले. निलेश बेलखेडे यांच्या विजयावर राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यानी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
The counting of votes for the Gondwana University Graduate Election 2022 was completed on September 8. Shiv Sena Praneet Yuva Sena contested the election for the first time in this election. Yuva Sena's official open category candidate Professor Nilesh Ramesh Belkhede won with a majority from the secular transformation panel. Many people from Shiv Sena revolted in the state, the rebels started to eliminate Shiv Sena, but in Chandrapur, Shiv Sena made the phrase "Tiger Abhi Zinda Hai" come true. Even in the last stage of counting of votes in a close fight, Nilesh Belkhede made it to the last round with a majority. Nilesh Belkhede has been active in the Shiv Sena Pranit Yuva Sena for many years, Belkhede's name is big in social causes along with politics. The Yuva Sena, under the leadership of Shiv Sena district chief Sandeep Girhe, trusted Belkhede by actively participating in the Gondwana University Senate elections. Yuva Sena Secretary Varun Sardesai had come to Chandrapur to campaign for Belkhede. Shiv Sena, Yuva Sena and Mitra Parivar made tireless efforts to win Nilesh Belkhede in the Senate elections. On the victory of Nilesh Belkhede, those working in the political and social sphere have showered congratulations.
