News 34 chandrapur
राजुरा - तालुक्यातील देवाडा अंतर्गत येणाऱ्या सोनूर्ली येथील शेतकरी विठ्ठल झिंगाजी गुरुनुले यांच्या मालकीचे दोन बैल अचानक मृत्यू पावल्याने आता पुढील शेती कसी कसावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या शेतकऱ्यावर ओढवलेल्या संकटांवर मात करण्यासाठी नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्याने केली.
Bull couple
Bull couple
राजुरा पासून पंधरा किलोमीटर अंतरावरील सोनूर्ली गावातील शेतकऱ्याच्या बैलांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. म्हणुन या शेतकऱ्याने उपचारासाठी देवाड्यातील पशु चिकित्सालयात नेले. मात्र तेथे कुणीही न मिळाल्याने हा शेतकरी आपली बैलजोडी उपचारासाठी वरूर रोड येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे आणले. तेथे या पशुवैद्यकाने त्यावर उपचार केले. मात्र दोन दिवसांच्या फरकाने दोन्ही बैल मरण पावले. प्रथम एक बैल मरण पावला, तेव्हा त्याला गाडण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी दुसराही बैल दगावल्याने उपचारावर शंका घेतली जाऊ लागली आहे. या शेतकऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार केली. Indian bull
या बैलांचा मृत्यू नेमका कशाने झाला, त्यासाठी राजुरा येथील पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जिलेवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन एका बैलाचे पोस्टमार्टेम केले. बैलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, ते अहवाल आल्यावर माहीत होईल असे डॉ. जिलेवार यांनी सांगितले. मात्र यामुळे ऐन शेतीच्या हंगामात बैलजोडी मृत्यू पावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आधीच अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत असताना हा मोठा आघात या शेतकऱ्यावर झाला आहे. या शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळावी, असी मागणी पीडित शेतकरी व गावकऱ्यांनी केली आहे.