News 34 chandrapur
बल्लारपूर - कम्प्युटर एज्युकेशन च्या नावाखाली भाजप कार्यकर्त्याने अल्पवयीन मुलीची छेडखानी केल्याची धक्कादायक बाब 1 सप्टेंबर ला उघडकीस आली. Molested minor girlशहरातील बाजपेयी कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये 16 वर्षीय मुलीची छेड काढल्याने भाजप कार्यकर्त्यांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी केली.
30 ऑगस्टला सकाळच्या सुमारास पीडित मुलगी कामानिमित्त इन्स्टिट्यूट मध्ये गेली होती, इन्स्टिट्यूट मध्ये विद्यार्थ्यांना MSCIT चे प्रशिक्षण दिल्या जाते.
सकाळी कुणी विद्यार्थी आले नव्हते त्या क्षणाचा फायदा घेत इन्स्टिट्यूट संचालक एड. संजय बाजपेयी यांनी मुलीला वाईट दृष्टिकोणाने हात लावत, मला तू आवडते असे म्हणत अश्लील पध्दतीने पीडित मुलीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला.
पीडित मुलीने तात्काळ तिथून बाहेर पडत ओळखीच्या शेजारी काकू ला सदर बाब सांगितली. शेजारी काकूने सदर गंभीर बाब मुलीच्या घरी सांगितली, आईने मुलीला विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला.
आरोपी बाजपेयीं हा भाजप पक्षाचा कार्यकर्ता असल्याने त्याने राजकीय पक्षातील मित्रांना प्रकरण मिटविण्यासाठी बोलाविले. Bjp worker
विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला, पण मुलीने खंबीर भूमिका घेत मागे हटणार नसल्याची भूमिका घेतली.
1 सप्टेंबर ला कम्प्युटर इन्स्टिट्यूट बाजपेयीं यांनी सुरू केल्यावर नागरिकांनी बाजपेयीं ला चांगलाच चोप देत बल्लारपूर पोलीस ठाण्यात नेले.
पीडित मुलीने पोलिसांसमोर संपूर्ण प्रकाराची बाब नोंदविली. Sexual abuse
बल्लारपूर पोलिसांनी तात्काळ संजय बाजपेयीं वर कलम 354, 354 A (I) (i) व पोक्सो 12 व 8 अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली.
बल्लारपूर विधानसभा ही भाजपचा गड आहे, आरोपी बाजपेयीं यांनी याआधी असे प्रकार केल्याची चर्चा शहरात सुरू होती.