News34 chandrapur
चंद्रपूर - लोकसभा निवडणुकीत भाजप हरल्यावर पुन्हा ती जागा परत घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. Congress
ज्याठिकाणी भाजप कमकुवत झाला त्याठिकाणी केंद्रीय मंत्र्यांचे मुक्कामी दौरे वाढले आहे. Fual price hike
चंद्रपूर लोकसभा कांग्रेसने जिंकली आता ही जागा पुन्हा भाजपकडे यावी यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी चंद्रपुरात 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहे. Petrol price hike
पेट्रोलियम मंत्र्यांना इंधन दरवाढीचा फटका काय? याबाबत चंद्रपूर शहर काँग्रेसच्या वतीने ND हॉटेल समोर अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन करणार आहे.
Petroleum minister
मागील काही वर्षांत इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. परंतु, केंद्र सरकारच्या वतीने दरवाढ कमी करण्यासंदर्भात कोणत्याही उपाययोजना केल्या जाताना दिसत नाही. अशात केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.