News34 chandrapur
चंद्रपूर : केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना या दरवाढीचा मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या ताफ्यासमोर निदर्शने करण्यात आली.
Fuel price hike जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता. २३) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास एन. डी. हॉटेलसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत इंधन दरवाढीचा निषेध नोंदविला. Chandrapur congress
देशात मागील आठ वर्षांत महागाईने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठिण झाले आहे. अशात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किमतीत दिवसागणिक वाढ होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका गोरगरिब, सर्वसामान्य कुटुंबांना सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेलने शंभरी गाठल्याने सर्वसामान्य, नोकरदार, खासगी क्षेत्रातील नोकरदार यांना वाहने चालविणे कठिण झाले आहे. इंधनात मोठा खर्च होत असल्याने घरचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तर, दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरने हजारी गाठल्याने देशात हजारो कुटुंबांसमोर पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यासमोर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत इंधन दरवाढीचा निषेध केला. Petroleum minister
इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. परंतु, केंद्र सरकारच्या वतीने इंधन दरवाढ कमी करण्यासंदर्भात कोणत्याही उपाययोजना केल्या जाताना दिसत नाही. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे नसल्याचा आरोप चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी यावेळी केला. आंदोलनात चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संगीता अमृतकर, चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, गोपाल अमृतकर, अख्तर (पप्पू) सिद्दीकी, कुणाल चहारे, भालचंद्र दानव, स्वाती त्रिवेदी, चंदा वैरागडे, अॅड. प्रीती शाह, राधिका बोहरा-तिवारी, पूजा अहुजा, ललिता रेवल्लीवार, नौशाद शेख, शाबिर सिद्दीकी, राहुल चौधरी, स्वप्नील चिवंडे, तवंगर खान, मोनू रामटेके यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.