News34 chandrapur
वरोरा - दिनांक 31/08/22 रोजी फिर्यादी धनराज बालाजी आसेकर रा. माडेळी यांनी रिपोर्ट दिली की, ते जिल्हा परिषद कैलास वासी मारोतराव डफ प्राथमिक शाळा माढेली येथे मुख्याध्यापक पदावर असून दिनांक 31/08/22 रोजी सरकारी सुट्टी असल्याने बंद शाळेत तीन महिला आरोपीतानी शाळेतील एलसीडी प्रोजेक्टर व 248 नग जेवण करण्याचे स्टील ताट एकूण किंमत 24800 रू चा मुद्देमाल चोरून नेला. अशा रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता, या गुन्हातील तीन महिला आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेला मुद्देमाल किंमत 24800 रु. चा हस्तगत करण्यात आला.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनात पोनी दीपक खोब्रागडे, पोस्टे वरोरा यांचे अधिपत्यात ग्रेड पोउपनी पुरुषोत्तम पेंढारकर, पोशी प्रसाद सालकाडे, पोहवा ईश्वर गायकवाड, पोशि ज्ञानेश्वर मडावी व गुन्हे प्रकटीकरण विभाग येथील अधिकारी कर्मचारी यांनी पार पाडली.