News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कावडपेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक तथा अध्यक्ष अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा मुल.जी.चंद्रपूर श्री. सुंदर मंगर यांचा शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्या बद्दल जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Zilla parishad chandrapur
विशेष म्हणजे, त्यांनी पुरस्कारासाठी याअगोदर अनेकदा प्रस्ताव सादर केले होते पण त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली नव्हती .परंतु यावर्षी अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. श्री. सुंदर मंगर हे मागील काही वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या ते जिल्हा परिषद शाळा कवडपेठ येथे विद्यादानाचे कार्य करीत आहे.
कोरोना काळात शाळा कुलूपबंद असतांना देखील त्यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकविण्याचे काम केले आहे. विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी याकरीता त्यांनी उपक्रम राबविले आहे.
शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातील कार्य सुध्दा उल्लेखनीय आहे. तसेच ओबीसी चळवळीचे खंदे कार्यकर्ते आहेत. कोरोना च्या महामारीत त्यांनी ग्रामीण भागात जनजागृतीचे काम केले आहे. त्यांच्या याच शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन शिक्षण विभागाने आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन आमदार किशोर जोगरेवार यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम बाखर्डे, कपिलनाथ कलोडे राज्य शिक्षक पुरस्कारप्राप्त ना.ग थुटे, शिक्षणाधिकारी लोखंडे, प्राचार्य चाफले, वित्त लेखा अधिकारी मातकार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ हिरुटकर, कार्यकारी अभियंता रायपुरे, लेखा अधिकारी धर्मराव पेंदाम, विलास वनकर, अमोल रोडे आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात आमदार जोगरेवार यांच्या हस्ते सुंदर आत्माराम मंगर यांचा सन्मानचिन्ह देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले. त्यामुळे ओबीसी संघटनेच्या वतीने,समाज बांधवांनी तसेच मित्र परीवाराणी सुंदर मंगर यांचे अभिनंदन केले आहे.
