News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल: मुल तालुक्यातील बफरझोन क्षेत्रात असलेल्या फुलझरी येथील डोनी जंगलात गुऱ्हे चराईसाठी नेलेल्या गुऱ्हाख्याला वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना (११ सप्टे.२०२२ ला ) सकाळी ११.३० वाजता घडली. Wild animals
Tiger attack
फुलझरी येथील रहिवासी असलेला किसन आबाजी वसाके (४९) असे जखमी गुऱ्हाख्याचे नाव आहे. सदर घटना डोनी बिट ३ कक्ष क्रमांक ३६० मध्ये घडली. नेहमीप्रमाणे जंगलात गुऱ्हे चराईसाठी नेले असता जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच लगेच वनरक्षक बोरकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जखमी गुऱ्हाख्याला मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला गंभीर जखमी असल्याने पुढील उपचाराकरिता चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वन विभागाकडून जखमी रुग्णाला तात्काळ १०,०००/- मदत देण्यात आली. Wild life
MUL: An incident (on 11 Sep 2022) occurred at 11.30 am when a tiger attacked and seriously injured a cowherd being taken for grazing in the Dhoni forest of Phulzari in the buffer zone area of Mul taluka.
Human Wildlife Conflict
The injured cowherd has been identified as Kisan Abaji Vasake (49), a resident of Phulzari. The said incident took place in Doni Bit 3 Room No. 360. As usual, while the cattle were being taken for grazing in the forest, the tiger that was in the forest attacked the cowherd and seriously injured him. As soon as he got the information about the incident, Forest Guard Borkar with the help of his staff admitted the injured Kisan Abaji Vasake to the Hospital at Mul. After first treatment, he was seriously injured and shifted to Chandrapur District General Hospital for further treatment. 10,000/- was immediately given to the injured patient by the Forest Department.
