News 34chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर - आरवट जवळील असलेल्या इराई नदीत शनिवारी 3 मित्र पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. यामध्ये दहावी वर्गात शिकणारा 16 वर्षीय ओम सचिन किन्नाके, पियुष नंदूरकर व स्नेहल मेश्राम हे तिघेजण पोहायला गेले, नदीपात्रात तिघांनी उडी घेतली, दोघेजण पाण्यात पोहत होते व ओम हा पाण्यातून बाहेर येत पुन्हा त्याने नदीपात्रात उडी घेतली, मात्र यावेळी ओम परत आला नाही.
ओम नदीच्या डोहात गेल्याने तो बुडाला, ओम चा नदीत बुडून मृत्यू झाला, रविवारी सकाळी ओम चा मृतदेह आढळला.
ओम हा गरीब कुटुंबातील असल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला.
On Saturday 3 friends went to enjoy swimming in Irai River near Chandrapur - Arwat.
In this, 16-year-old Om Sachin Kinnake, Piyush Nandurkar and Snehal Meshram, studying in class 10, went swimming, three of them jumped into the river, two of them were swimming in the water and Om came out of the water and again jumped into the river, but this time Om did not come back.
Om drowned after falling into the river, Om died after drowning in the river, Om's body was found on Sunday morning.
Since Om was from a poor family, a mountain of grief fell on his family.
