News34 chandrapur
ब्रम्हपुरी - चंद्रपूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून रविवारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील महिला शेतकाम करायला शेतावर गेली होती. अचानक वीज कोसळल्याने यात तिचा मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास आवळगांव शेत शिवारात घडली.
Lightning strike
Lightning strike
आवळगांव येथील अश्विनी सुधिर नरूले (30) ही महिला सात ते आठ महिलांना सोबत घेऊन शेतावर निंदन करण्यासाठी गेली होती. निंदन सुरू असताना दुपारी तीन वाजता जेवण करायला शेतातीलच एका झाडाखाली सर्व शेतकरी महिला बसल्या असतांना पाऊस सुरू झाला. यानंतर थोड्या वेळातच महिला बसुन असलेल्या झाडावर विज कोसळली. यामध्ये शामल लोळे ही महिला जागीच ठार झाली तर ज्योती निलेश पोहनकर (25) व अश्विनी सुधीर नरूले (40) या दोन महिला जखमी झाल्या. जखमी महिलांना तात्काळ सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले असून सदर घटनेची माहिती मेंडकी पोलिसांना देण्यात आली.
Bramhapuri - Chandrapur district has received heavy rains and heavy rains started on Sunday along with lightning. A woman from Avalgaon in Brahmapuri taluka had gone to the farm to do agricultural work. She died due to a sudden lightning strike. This incident took place in Avalgaon Shet Shivar at around 3 pm on Sunday.
Ashwini Sudhir Narule (30) from Avalgaon had taken seven to eight women along with her and went to the farm to condemn. While Nindan was going on, at three o'clock in the afternoon, when all the farmer women were sitting under a tree in the field to eat, it started raining. Shortly after this, lightning struck the tree where the woman was sitting. Shamal Lole was killed on the spot while Jyoti Nilesh Pohankar (25) and Ashwini Sudhir Narule (40) were injured. The injured women were immediately shifted to the general hospital and the incident was reported to the Mendki police.
