News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात राहणारे उत्कृष्ट व्यक्तिमत्व यांचा विदर्भातील अग्रगण्य वृत्तपत्र दैनिक नवराष्ट्र द्वारे मराठी अस्मिता पुरस्कार 2022 ने गौरविण्यात आले. दरवर्षी दैनिक नवराष्ट्र वृत्तपत्राद्वारे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या समाजसेवकांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात येतो. Daily navrashtra
10 सप्टेंबर ला शहरातील राधाकृष्ण सभागृहात आयोजित मराठी अस्मिता पुरस्कार कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, अभिनेता अतुल परचुरे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजित कार्यक्रमात तब्बल 38 मान्यवरांचा गौरव करण्यात आला. चंद्रपुरातील सामाजिक समता संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहम्मद इरफान शेख यांचा युवा समाजसेवक म्हणून वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. इरफान शेख अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे, त्यांनी अनेक सामाजिक चळवळीत भाग घेत सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आहे. दैनिक नवराष्ट्र तर्फे त्यांचा सत्कार म्हणजे केलेल्या कामाची पावती आहे. त्यांचे सामाजिक, राजकीय व मित्र परिवारातर्फे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

An outstanding personality living in the nooks and crannies of Chandrapur district has been felicitated with the Marathi Asmita Award 2022 by the leading newspaper of Vidarbha, Dainik Navarashtra. Every year, a felicitation program for social workers who created the world from nothing is organized by Dainik Navrastra newspaper. Forest Minister Sudhir Mungantiwar, actor Atul Parchure, Gondwana University Vice-Chancellor Prashant Bokare, District Central Bank President Santosh Rawat were prominently present in the Marathi Asmita Award program held at Radhakrishna Auditorium in the city on September 10. As many as 38 dignitaries were honored in the organized program. President of Chandrapur Social Equality Struggle Committee Mohammad Irfan Sheikh was also felicitated by Forest Minister Mungantiwar. Irfan Sheikh has been working in the social and political field for many years, he has participated in many social movements and has spread the message of equality among all religions. His felicitation by Dainik Navrastra is an acknowledgment of the work done. He is being congratulated everywhere by his social, political and family friends.