News34 chandrapur
चंद्रपूर - प्रधानमंत्री कुसुम योजना केंद्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली. या योजणेच्या घटक ब सौरपंप वितरीत करण्याच्या योजनेअंतर्गत अर्जदारांना ३ व ५ एच.पी. क्षमतेचे सौरपंप चंद्रपूर परिमंडळातर्गत चंद्रपूर मंडलात ९६ व गडचिरोली मंडलात ९० असे एकंदरीत १८६ सौरकृषिपंप अर्जदारांना मंजूर करण्यात आले असून त्यामुळे १८६ शेतकरी बांधवांच्या शेतशिवारात या सौरपंपाच्या माध्यमातून खळखळणारे पाणी वाहत बळीराजाचे शेतशिवार सुर्य देवतेच्या प्रकाशरुपी आशिषाने बहरुन आली आहेत.
तसेच, नापिक आणि अकृषिक जमिनीचा वापर करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ) केंद्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली. या योजनेद्वारे सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण होणारी वीज महावितरणला विकून अथवा सौर प्रकल्पासाठी जमिन भाडे पट्टीवर देऊन उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली. सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता इच्छुकांनी महावितरणच्या www.mahadiscom.in/solar-mskvy या संकेत स्थळावर भेट दयावी. किंवा महावितरणच्या नजीकच्या कार्यालयास संपर्क साधावा.
घटक अ अंतर्गत ०.५ ते २ मे.वॅ. क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प प्राधान्याने, शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आणि पाणी वापरकर्ता संघटना (डब्ल्यूयुए) हे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याची योजणा जाहिर करण्यात आली होती. भौगोलिक परिस्थितीनुसार तथा हे उपकेंद्र उभारण्याच्या व्यवहार्ततेनुसार अर्जदारांना हे सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर होणार आहेत. हे सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळच्या ३३/११ के व्ही. उपकेंद्राशी थेट जोडला जाणार आहेत. महाउर्जा विकास अभिकरण द्वारा महावितरणच्या कार्यक्षेत्रात कुसुम योजणा घटक ब राबविण्यात येंत आहे. घटक ब अ्ंतर्गत ईच्छूकांनी अर्ज करुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे तसेच यांनी केले आहे.
Pradhan Mantri Kusum Yojana was launched by the Central Govt. Under component B of this scheme, the scheme to distribute solar pumps to the applicants of 3 and 5 H.P. Capacity Solar Pumps 96 in Chandrapur Mandal and 90 in Gadchiroli Mandal under Chandrapur Parimandal have been approved to 186 solar agricultural pump applicants and therefore the fields of 186 farmers have been blessed with the blessings of the Sun God by flowing water flowing through these solar pumps.
Also, the Pradhan Mantri Kusum Yojana (Component A) was launched by the Central Government with the objective of increasing the income of farmers by utilizing barren and non-agricultural land. Through this scheme, the farmers got an opportunity to earn income by selling the electricity generated in the solar power project to the Mahadistribution or by leasing the land for the solar project. Aspirants should visit Mahadiscom website www.mahadiscom.in/solar-mskvy to avail the scheme. Or contact the nearest office of Mahavitran.
0.5 to 2 May under component A. Capacity Decentralized Solar Power Projects On priority, farmers, farmer cooperatives, panchayats, farmer producer organizations (FPOs) and water user associations (WUAs) were announced to develop solar power projects. According to the geographical conditions and the feasibility of setting up these sub-stations, the applicants will be approved for these solar power projects. This solar power project is 33/11 KV near Mahavitran. will be directly connected to the sub-centre. Component B of the Kusum Yojana is being implemented by the Mahaurja Vikas Abhikaran under the scope of Mahavitaran. Chief Engineer of Mahavitaran Chandrapur Parimanda Shri. Sunil Deshpande has done the same.
