News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर बल्लारपूर बायपास मार्गाजवळ 2 सप्टेंबर ला रात्री भयावह अपघात घडला.या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू तर दुसरा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
रात्रीची वेळ असल्याने दोन्ही वाहने भरधाव वेगात होती, अचानक दुचाकी वाहनवरील नियंत्रण सुटले आणि सरळ चारचाकी वाहनाला जाऊन धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती की एक युवक जागीच मृत्यू पावला तर दुसरा गंभीर जखमी झाला.
मृतक युवक हा नागपूर निवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
जखमी युवकाला नागरिकांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.