News34 chandrapur
चंद्रपूर - राज्यात भाजपला अधिक सक्षम बनविण्यासाठी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यातील विविध जिल्ह्यात दौरा करीत आहे. Political breakingपक्ष संघटनात्मक बैठकी, लोकसभा व विधानसभा निहाय बैठकीसाठी 2 सप्टेंबर ला चंद्रशेखर बावनकुळे हे चंद्रपूरच्या दौऱ्यावर आले होते.
स्थानिक शासकीय विश्रामगृहात पत्रकारांच्याया अनेक प्रश्नावर मनमोकळे पणाने बावनकुळे यांनी उत्तर दिले. BJP's alliance with Shiv Sena in elections
शिवसेनेसोबत 25 वर्षाची युती तुटल्यावर भाजप कुणाशी युती करणार याबाबत बावनकुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. Election
शिवसेना हाच आमचा मित्रपक्ष असल्याचे सांगत आमची युती पुन्हा शिवसेनेसोबतचं राहणार अशी प्रतिक्रिया दिली. पण ती शिवसेना शिंदे गटाची असणार आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही शिवसेनेसोबत युती करून लढू व राज्यात क्रमांक 1 चा पक्ष राहू अशी ग्वाही बावनकुळे यांनी यावेळी दिली.
राज्यात ज्या ठिकाणी भाजप पक्षाला लोकसभा व विधानसभा क्षेत्रात पराभव पत्करावा लागला ती जागा भाजप पुन्हा जिंकणार असा दावाही यावेळी बावनकुळे यांनी केला. Bjp back again
यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, खासदार अशोक नेते व आमदार किर्तीकुमार भांगडीया उपस्थित होते.