News34 chandrapur
चंद्रपूर - 9 सप्टेंबरला चंद्रपूर शहरात बाप्पा ला निरोप देण्यासाठी हजारो नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती, मात्र यंदा च्या विसर्जन सोहळ्यात अनेक प्रकारचे विघ्न आडवे आले.
चंद्रपुरातील मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता, त्यानंतर गणेश मंडळातील सर्व कार्यकर्ते एकत्र येत ठिय्या आंदोलन केले.
पोलिसांना चंद्रपूरचा राजा गणेश मंडळासमोर झुकावे लागले, लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबनाची कारवाई पोलीस अधीक्षकांनी केली, त्यानंतर ठिय्या आंदोलन समाप्त करण्यात आले होते. Jatpura yuvak ganesh mandal
मात्र चंद्रपूरचा राजा गणपतीचे विसर्जन काही कारणास्तव होऊ शकले नाही.
चंद्रपूरचा राजा श्री गणेश मूर्तीचा विसर्जन सोहळा 14 सप्टेंबर ला होणार आहे.
अशी माहिती जटपुरा युवक गणेश मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. Chandrapurcha raja
सकाळी 11 वाजता चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे, सर्वांचा लाडका बाप्पा चंद्रपूरचा राजा ला निरोप देत बाप्पाचे दर्शन घ्यावे असे आवाहन जटपुरा युवक गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.