News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - : येथील रेल्वे स्टेशन परिसरात प्रस्तावित होत असलेल्या मालधक्काचे कामात जवळ असलेल्या असंख्य मौल्यवान वृक्षांची तोड करण्यात आली आणि असंख्य वृक्षांची पुन्हा तोड होणार असुन ती त्वरित थांबविण्यात यावी यासाठी आज (20 सप्टेंबर) रोजी तहसील कार्यालय मुल येथे पर्यावरण वादी युवकांनी मुकमोर्चा काढुन होणाऱ्या वृक्ष तोडीला तिव्र विरोध करून वृक्ष तोड थांबवावी आणि होत असलेला मालधक्का मुल नगरात होऊच देऊ नये यासाठी पुढील आंदोलन तीव्र होईल असा इशारा देखील मूक मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलन कर्त्यानी दिला.
Railway siding
मूल येथील गांधी चौकात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयाला मार्लापण करून शांततेत मुकमोर्चा काढण्यात आला. यावेळी मालधक्का हटाव पर्यावरण बचाव, निसर्ग आपली माता, तिचे आपण रक्षणकर्ता, पर्यावरणाची सुरक्षा हीच आहे तपस्या यासह विविध घोषणा देत मोर्चाकरी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांकडे निवेदन सुर्पुद केले.
यावेळी उपस्थितांनी मूल शहरात मालधक्का नकोच याचा नगर वासियांतर्फे निषेध करण्यात येत आहे. अशी मागणी करण्यात आली. जो पर्यंत मालधक्याचे काम थांबत नाही, तो पर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढतच राहील असाही सुर आंदोलन कर्त्यांचा दिसून आला.