News 34 chandrapur
चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांची मंत्रीपदावर वर्णी लागताच जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे याबाबत तब्बल 114 कामांची यादी त्यांनी तयार केली असल्याचे 3 सप्टेंबर ला आयोजित श्रमिक पत्रकार संघाच्या Meet The Press कार्यक्रमात सांगितले.
सुधीर मुनगंटीवार यांना वने, मत्स्यव्यवसाय व सांस्कृतिक मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे.
जिल्ह्यात राबविन्यात येणारे नवे विकासात्मक कामे, भविष्यातील विविध योजना याबाबत मुनगंटीवार यांनी पत्रकारांसोबत मनमोकळे पणाने संवाद साधला. Minister sudhir mungantiwar
जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा कसा सुधारणार यावर त्यांनी काम ही सुरू केले आहे, आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नवी इमारत लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत सुरू करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
मात्र जिल्ह्यातील पुराचा प्रश्न व वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला त्यांनी बगल देत पूर व वाहतूक कोंडी ही जागतिक समस्या असल्याचे सांगितले तरीसुद्धा यावर काय उपाययोजना करता येईल त्याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. शहरात व जिल्ह्यात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वेगळा बायपास तयार करता येणार काय यावर सध्या काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
Cricket academy
चंद्रपूर जिल्ह्यात उत्कृष्ट अशी क्रिकेट अकॅडमी सुरू करू अशी माहिती देत चंद्रपुरात विमानतळ लवकर सुरू व्हावे यासाठी आपण सतत पाठपुरावा करीत असल्याची मुनगंटीवार यांनी माहिती दिली. News34