News34 chandrapur (रमेश निषाद)
बल्लारपूर - बल्लारपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या कारवा जंगलाकडे जाणाऱ्या मार्गावर शासकीय रुग्णालयातील कचरा रस्त्यावर रस्त्यावर फेकण्यात आल्याने नागरिकांद्वारे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
त्या मार्गावर सकाळी नागरिक फिरायला जात असतात, रुग्णालयातील कचऱ्याची दुर्गंधी दूरवर पसरली असल्याने सकाळी नागरिकांना त्याचा त्रास व्हायला लागला, त्या कचऱ्यात महिला रुग्णांद्वारे वापरलेले Sanitary pads सुद्धा आहे, जे वन्यप्राण्यांसाठी अत्यन्त धोकादायक आहे.
शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे काम बल्लारपूर नगरपरिषदेद्वारे करण्यात येते मात्र पहिल्यांदा रुग्णालयातील कचरा जंगल मार्गावर फेकण्यात आलेला आहे. Threat to wildlife
ही संदेहास्पद बाब असून याबाबत बल्लारपूर वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी आता जंगलात कचरा फेकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
Hospital waste
