News34 chandrapur
चंद्रपूर - दरवर्षी विविध देशात आयोजित होणारी जागतिक स्ट्रेनग्यथलिफ्टिंग स्पर्धा 2022 यंदा किरगिस्तान या देशात आयोजित करण्यात आली होती. https://worldstrengthlifting.com/index.php
या स्पर्धेत भारतासहित अनेक आशियाई देशांनी सहभाग घेतला होता. किरगिस्तान देशात 9 वी जागतिक स्ट्रेनग्यथलिफ्टिंग व इन्कलाईन बेंचप्रेस स्पर्धेत महाराष्ट्रातून चंद्रपुरातील 65 किलो वजनगटातून मोसीन बानो यांनी सहभाग घेतला.
सिनियर वूमन या गटात मोसीन बानो यांनी इन्कलाईन बेंचप्रेस स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले. Athletes
तसेच स्ट्रेनग्यथलिफ्टिंग स्पर्धेत मोसीन यांनी 300 किलो वजन उचलत रौप्य पदक प्राप्त केले.
कर्लिंग या प्रकारात मोसीन यांनी 40 किलो वजन उचलत नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला.
तसेच नागपूर जिल्ह्यातील महेश सावरकर यांनी 85 किलो वजनगटातून 450 किलो आणि इन्कलाईन या स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले.
World Strength Lifting Championships
वाशीम येथील शेख कौसर शेख फट्टू यांनी 68 किलोग्राम मास्टर गटातून 340 किलो तर इन्कलाईन या दोन्ही प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
राज्यातील स्पर्धकांनी जागतिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र स्ट्रेनग्यथलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत डोनगावकर, महासचिव विनायक जवळकर, कोषाध्यक्ष पराग पाठक, प्रमोद वालमांडरे, सचिन मायने, श्रीकांत वरनकर, अमित दुर्गे, सूर्यकांत उंबरकर, लक्ष्मीकांत मेश्राम, आनंद डाबरे, गजानन पांडे, संदीप मोहतो यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. 9th- World Strengthlifting And Incline Benchpress Championship 2022
