News34 chandrapur
चंद्रपूर - CSTPS मधील CHP 500M/W मधील इलेक्ट्रिकल विभागातील निविदा वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे तब्बल 20 कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे.
31 मे रोजी निविदेचा कालावधी संपुष्टात आला होता, त्यानंतर तात्काळ नवी निविदा काढत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते, मात्र सदर कामाला 2 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली, पण मुदतवाढ संपल्यावर सुद्धा निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. Worker hunger strike
त्यामुळे कसलीही पूर्वसूचना न देता 20 कामगारांना कामावरून कमी करण्यात आले, निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामगारांना कामावर पूर्वरत करावे या मागणीसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वीज कामगार संघटनेच्या नेतृत्वात 20 कामगारांनी मेजर गेटवर साखळी उपोषण सुरु केले.
अचानक कामावरून कामगारांना कमी केल्याने कामगारांचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण झाले असून लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामगारांना कामावर घ्यावे अन्यथा साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात करू, व आंदोलन दरम्यान कामगारांचे काही बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार महाऔष्णिक विद्युत केंद्र राहणार असा इशारा वीज कामगार संघटनेमार्फत दिला आहे.
