News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल येथील निवासी व दरार गणेश मंडळाचे सदस्य बी.एस एफ. सैनिक खालिद शेख हे आपल्या सैनिक सेवेचा बॉण्ड पूर्ण करुन मुल येथे परत आल्याने दरार गणेश मंडळातर्फे त्यांचे मुल शहरात आगमन होताच वॉर्डांत व नगरात स्वागताचे बॅनर लाऊन उस्फुर्तपणे भावपूर्ण स्वागत करण्यात आले. Army bond खालिद शेख यांचे हस्ते मुल येथील गांधी चौकातील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.यानंतर दरार क्रिकेट मंडळाचे सभासद व अनेक नागरिक उपस्थित राहून मिरवणुकीस सैनिक खालिद शेख यांना पोस्ट आफिस जवळच्या महात्मा फुले चौकात आणून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी दरार गणेश मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रशांत समर्थ, पोलीस निरीक्षक सतिष सिंह राजपूत, माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, महेंद्र करकाडे, विनोद सिडाम, किशोर कापगते, दिलीप सूचक यांचेसह वार्डातील अनेक नागरिक आणि दरार मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
Mul - As Soldier Khalid Sheikh returned to Mul after completing his military service bond, Daraar Ganesh Mandal gave him a warm and emotional welcome as soon as he arrived in the city by putting up welcome banners in the wards and the city. Khalid Sheikh garlanded the statue of Mahatma Gandhi at Gandhi Chowk in Mul. After this, the members of Darar Cricket Board and many citizens were present and the soldier Khalid Sheikh was brought in a procession to Mahatma Phule Chowk near Post Office and welcomed him. On this occasion, President of Daar Ganesh Mandal, former corporator Prashant Samarth, police inspector Satish Singh Rajput, former vice-president Nandu Randive, Mahendra Karkade, Vinod Sidam, Kishore Kapgate, Dilip Sukhtar along with many citizens of the ward and all the office bearers of Daar Mandal were present.
