News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रस्ता म्हणजे जिल्ह्यात कुठे 10 फूट लांब खड्डे नसलेला बागला चौक ते लालपेठ पर्यंत जाणाऱ्या मार्गावर आज भयावह अपघात घडला.
प्राथमिक आरोग्य केंद्र देवाडा येथील आपात्कालीन 108 रुग्णवाहिका दुपारच्या सुमारास एका रुग्णाला चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी आली होती. 108 ambulance
रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यावर रुग्णवाहिका चालक परतीच्या प्रवासावर निघाला.
मात्र राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ पोहचताच एक महिला wrong side वेगात दुचाकीने येत होती.
अपघात होऊ नये म्हणून रुग्णवाहिका चालकाने रुग्णवाहिका अक्षरशः थांबवित त्या महिलेला आवाज दिला मात्र त्या महिलेचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले. Potholed
त्या महिलेने उभ्या रुग्णवाहिकेला धडक दिली.
या धडकेत त्या महिलेच्या पायावर व डोक्यावर गंभीर दुखापत झाली, नागरिकांनी तिला तात्काळ रुग्णालयात पोहचविले. Accident
त्या जखमी महिलेचे नाव 33 वर्षीय सुरभी रामगिरवार असे असून ती गांधी चौकात राहते.
शासकीय रुग्णालयात नेल्यावर तिला खाजगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता मात्र प्रकृती बिघडल्यावर सुरभी ला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
सदर अपघाताच्या घटनेचा तपास महाकाली पोलीस चौकी मधील पोउपनी विजय मुक्के, व पोलीस कर्मचारी रामदास चिताळे व संजय धोटे करीत आहे.