News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने डोके वर काढले होते. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात सांस्कृतीककार्यक्रम व सण साजरे करण्यास मनाई करण्यात आले होते. दरम्यान, यंदा कोरोना रूग्ण संख्य़ा आटोक्यात आल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. Police Route march
यंदा गणेशोत्सवात नागरीकांमध्ये उत्साह दिसून आला. घरोघरी आणि गल्लोगल्लीत गणेश मंडळाची
स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, गणेशोत्सव शांततेत साजरा होण्याच्या पार्श्वभूमीवर मुल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव निमीत्य कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मूल शहरातील तेली मोहल्ला,ढीवर मोहल्ला, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिख मोहला, जुना रेल्चे स्टेशन, गांधी चौक, बस स्टॉप, सोमनाथ मार्ग यासह शहरातील मख्य मार्गाने व गर्दीचे ठिकाण, मिश्र वस्ती आणि संवेदनशील भागातून मूल पोलीस स्टेशनच्या वतिने रुट मार्च काढण्यात आले. Chandrapur police
सदर रुट मार्च मध्ये 6 अधिकारी ३5 अंमलदार, एस आर पी एफ विभाग 1, आर सी पी 1 अधि, 19 अंमलदार व सैनिक 24 सहभागी झाले होते. Ganeshotsav 2022
गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर रूट मार्च काढण्यात आला. यावेळी मुल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, यांच्यासह विविध विभागातील पोलीस कर्मचारी व फौजफाटा उपस्थित होते.