News 34 chandrapur
भद्रावती - मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेले असल्यामुळे पिककर्ज माफ करुन नवीन पीक कर्ज देण्यात यावे या विषयावर वरोरा व भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांची सभा (दि.१) ऑगस्टला रवि शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडली.
या सभेमध्ये वेकोली क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची नुकसान भरपाई वेकोलीने सी.एस.आर. फंडातून करावी तर इतर गावातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची नुकसान भरपाई शासनाने करावी, तथा पीक कर्ज १००% माफ करुन नवीन पीक कर्जाचा पुरवठा त्वरीत करावा, अशी मागणी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवी शिंदे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केली. new crop loan
यासाठी आता दोन्ही तालुक्यातील सहकारी संस्था व ग्रामपंचायत ठराव घेवून जिल्हाधिकारी मार्फत राज्यशासनास पाठविणार आहे. याबाबत नियोजन सुरु केलेले आहे.