News34 chandrapur
ब्रह्मपुरी - गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक दिनांक ४ सप्टेंबर २०२२ ला होऊ घातली आहे. सदर निवडणुकीमध्ये पदवीधर मतदार संघाकरिता यंग टीचर्स असोसिएशन, विदर्भ माध्यमिक संघ, नूटा, विजुक्ता, गोंडवाना शिक्षक संघटना, पंजाब राव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र व्होकेशनल टीचर असोसिएशन अशा शिक्षक संघटना एकत्र येवून शिक्षक महाआघाडी स्थापन करूण सुधाकरराव अडबले सहकार्यवाह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व डाॅ.प्रदिप घोरपडे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवीत आहे.
समविचारी मंडळींच्या वतीने नागभिड येथील महात्मा गांधी महाविद्यालयांमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. Teachers Association
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकरराव अडबले सहकार्यवाह डॉ. सतीश वारजूरकर माजी अध्यक्ष जि. प. चंद्रपूर, डॉ. अनिल शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे नेते अशोकभाऊ रामटेके, सूर्यकांत खनके, जगदिश जुनघरी, डॉ. प्रदीप घोरपडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. Gondwana University Senate Election
सदर प्रसंगी डॉ. रघुनाथ बोरकर डॉ. मोहन जगनाडे, रमाकांत लोधे, प्राध्यापक तेलखेडे, प्रा. विजय धरत, स्वप्नील कावळे इत्यादी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. गोविंदराव भेंडारकर यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन सतीश मेश्राम यांनी केले सदर कार्यक्रमांमध्ये पदवीधर मतदारसंघातील डॉ. दिलीप चौधरी, अँड. गोविंद भेंडारकर ,अजय लोंढे, चंद्रशेखर जुमडे, विजय कुत्तरमारे,दीपक धोपटे, तनुश्री आत्राम, राजेंद्र कन्नमवार,सुनील शेरकी, सौ. विद्या शिंदे या दहाही उमेदवारांनी आपला परिचय करून दिला, सदर कार्यक्रमात अशोक रामटेके उपाध्यक्ष नगरपरिषद ब्रह्मपुरी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाआघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. उमेदवार सुनील शेरकी यांनी मतदान पद्धती आणि प्रक्रिया याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. गणपतराव देशमुख यांनी केला.
